English
I was having an average morning until I sat down in front of my office computer.
“Your password has expired,” a server message flashed on my screen, with instructions for changing it. In my company, we have to change our passwords monthly.
I was deeply depressed after my recent breakup. Disbelief over what she had done to me was all I had on mind the whole day.
I remembered a tip I’d heard from my former boss. He’d said, “I’m going to use a password that is going to change my life.”
I couldn’t focus on getting things done in my current mood. The prompt to change the password reminded me that I shouldn’t let myself be a victim of my recent breakup, and that I was strong enough to do something about it.
So I changed my password to: Forgive@her. I had to type this password several times every day, each time my computer would lock. Each time I came back from lunch, I wrote forgive her.
This simple action changed the way I looked at my ex-girlfriend. That constant reminder of reconciliation led me to accept the way things happened and helped me deal with my depression.
By the time the server prompted me to change my password the following month, I felt free, and I loved that feeling. I was astonished to see such miraculous results of this little experiment! So, I decided to continue with it.
The next time I had to change my password I thought about the next thing that I had to get done. My password became Quit@smoking4ever.
It motivated me to follow my goal and I was able to quit smoking.
One month later, my password became Save4trip@europe, and in three months I was able to visit Europe.
Reminders helped me materialize my goals and kept me motivated and excited. It’s sometimes difficult to come up with your next goal, but keeping at it brings great results.
After a few months, my password was –
lifeis#beautiful!!!
And I knew life was going to change again.
Internal talk matters, what we tell ourselves conditions us to think in that direction and we can witness real-time results. We create a destiny for ourselves by our everyday thoughts – our wishes, what attracts us and repels us, our likes and dislikes
Source Credit: Heartfulness
Marathi
जीवनाचा पासवर्ड
माझी सकाळ ठीक चालू होती, जोपर्यंत मी ऑफिसच्या कॉम्प्युटरसमोर बसलो नव्हतो.
“तुमचा पासवर्ड कालबाह्य झाला आहे,” माझ्या स्क्रीनवर सर्व्हरचा संदेश झळकला आणि पासवर्ड बदलण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आमच्या कंपनीमध्ये दर महिन्याला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
नुकताच झालेल्या ब्रेकअपनंतर मी खूप निराश होतो. तिने माझ्याबरोबर जे काही केले त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता आणि तीच गोष्ट दिवसभर माझ्या मनात चालू होती.
माझ्या माजी बॉसने दिलेली एक टिप मला आठवली. त्याने सांगितले होते, “मी असा पासवर्ड वापरणार आहे जो माझे जीवन बदलून टाकेल.”
सध्याच्या मनःस्थितीत मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. पासवर्ड बदलण्यासाठी आलेल्या सूचनेने मला आठवण करून दिली की मी स्वतःला ब्रेकअपचे बळी बनू न देता काहीतरी करण्याइतका मी नक्कीच मजबूत आहे.
मग मी माझा पासवर्ड बदलला: Forgive@her. मला हा पासवर्ड दररोज अनेक वेळा टाईप करावा लागायचा, प्रत्येक वेळी जेव्हा माझा कॉम्प्युटर लॉक व्हायचा तेव्हा, लंचवरून परत येऊन प्रत्येक वेळी मी टाईप करायचो, Forgive@her.
या साध्या कृतीने माझ्या माजी प्रेयसीबद्दल पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. सतत होणाऱ्या या आठवण मुळे मला जे झाले त्याचा स्वीकार करणे सोपे झाले आणि माझ्या नैराश्याला सामोरे जाण्यास मदत झाली.
जेव्हा पुढच्या महिन्यात सर्व्हरने मला पासवर्ड बदलण्याची सूचना दिली, तेव्हा मी मोकळा झाल्यासारखा वाटले आणि मला तो अनुभव आवडला. या लहानशा प्रयोगाचे असे चमत्कारीक परिणाम पाहून मी अचंबित झालो! म्हणून मी हेच चालू ठेवण्याचे ठरवले.
जेव्हा मला पुढच्या वेळी पासवर्ड बदलावा लागला तेव्हा माझ्या पुढच्या उद्दिष्टाचा विचार केला. माझा पासवर्ड झाला Quit@smoking4ever.
त्याने मला माझे ध्येय गाठण्यासाठी प्रेरित केले आणि मी धूम्रपान सोडण्यात यशस्वी झालो.
एक महिन्यानंतर, माझा पासवर्ड झाला Save4trip@europe, आणि तीन महिन्यात मी युरोपला भेट दिली.
या आठवणींनी मला माझे ध्येय साध्य करण्यास मदत केली आणि मला प्रेरित केले आणि उत्साहित ठेवले. आपले पुढचे ध्येय काय असावे हे ठरवणे कधीकधी कठीण होते, परंतु सातत्य ठेवले तर उत्तम परिणाम मिळतात.
काही महिन्यानंतर माझा पासवर्ड झाला lifeis#beautiful!!!
आणि मला ठाऊक झाले की जीवन पुन्हा बदलणार आहे.
आत्मीय संवाद महत्त्वाचा असतो, आपण स्वतःला काय सांगतो यावर आपले विचार अवलंबून असतात आणि आपण प्रत्यक्षात त्याचे परिणाम अनुभवू शकतो. आपल्या रोजच्या विचारांनी आपण स्वतःसाठी एक भविष्य निर्माण करतो – आपल्या इच्छा, आपल्याला जे आकर्षित करते आणि जे दूर करते, आपल्या आवडी आणि नापसंती.
Source Credit: हार्टफूलनेस